विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि गुरु यांच्या
कष्ट व मेहनतीची जाणीव ठेवावी - प्रा.अतुल दुबे
परळी वैजनाथ येथील राजपूत धोबी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रविण्या मिळणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
परळी वैजनाथ शहरातील संत गाडगेबाबा सभागृहात राजपूत धोबी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळणार्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना बीड उप जिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी कु.दिव्या शंकर बुंदेले,कु.आचल राजूसिंग पुरभय्ये,कु.अंजली संजयसिंग परदेशी,कु.संजना जयसिंग चंदन, चि.धिरज संतोषसिंग चौधरी,चि.दिनेश प्रतापसिंग पुरभय्ये,चि.आलोक रजूसिंग पुरभय्ये,चि.अरूण कैलास चौधरी,चि.योगेश संतोषसिंग चौधरी या विदयार्थ्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.: मतभेदांमुळे जे काही घडतं आहे | हिंदुरुदय सम्राट | बाळासाहेब ठाकरे | यांचे विचार आजही तेवढेच प्रहार करतात.. https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_29.html#.Yr1LL0wf1yY.whatsapp
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना युवासेना बीड जिल्हा समन्वयक प्रा.अतुल दुबे म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाच्या मागे त्यांच्या आई - वडील यांचे कष्ट असतात तर गुरुजणांनची मेहनत असते या गोष्टीची जाणीव ठेवावी असे सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना परळी शहर उप प्रमुख तथा राजपूत धोबी समाज संघटनेचे सचिव किशन बुंदेले यांनी केले या वेळी युवासेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी,राजूसिंग बुंदेले,प्रकाशसिंग शेंर्दे,संजयसिंग बुंदेले,प्रतापसिंग पुरभय्ये, संतोषसिंग चौधरी, अतीषसिंग बुंदेले,राजूसिंग पुरभय्ये,शंकर बुंदेले,दिलीप बुंदेले,लखन बुंदेले,अर्जुन बुंदेले,विशाल परदेशी,अमोल शेंर्द रणवीर बुंदेले,राजूसिंग बुंदेले,संजयसिंग बुंदेले,संतोषसिंग चौधरी,राजूसिंग पुरभय्ये,रोहीत पुरभय्ये,आजय बुंदेले,कैलास बुंदेल,मयुर बुंदेले,दिपक पुरभय्ये,जयसिंग चंदन आदी सहा विद्यार्थ्यांचे पालक व प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. newsmajha: BIG NEWS | शपथविधी | मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार.. ....................................... https://aplaepaper.blogspot.com/2022/06/blog-post_30.html#.Yr10lZghiF0.whatsapp



0 Comments