अनुभव आणि निसर्ग हे सर्वश्रेष्ठ गुरू ठरतात ...गुरू पौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा !
माणूस म्हणून जन्माला आल्या नंतर जन्मापासून ते अंतिम समायापर्यंत माणूस हा ज्ञानाची आस असणारा विद्यार्थीच असतो. अर्थात मानवाच्या जीवनात त्याचे आई वडील आणि शिक्षक यांचे स्थान गुरुस्थानी सर्वोच्च असते. त्यानंतर अनुभव आणि निसर्ग हे त्याचे सर्वश्रेष्ठ गुरू ठरतात.
माणूस कितीही प्रगल्भ आणि समृद्ध झाला तरीही परिपूर्ण होतोच असे नाही. त्याच्या सानिध्यात येणारे लहान, मोठे, गरीब, श्रीमंत, समाज्यातील सर्वोच्च किंवा समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या कडून त्यास कधी न कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे ज्ञान हे मिळतच असतं. अगदी तसचं आपल्या सानिध्यामुळे आपल्या मार्गदर्शनामुळे मलाही कांही गोष्टींचे ज्ञान मिळाले आहेच. त्यामुळे तुम्हीही मला गुरुस्थानीच आहात... म्हणूनच गुरुवर्य आपणास गुरू पौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा...
आपलाच.... संतोष



0 Comments