तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राच्या धरतीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायम स्वरूपी विकास होणार
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायम स्वरूपी विकास होणार. यासाठी देशातील तिरुपती बालाजी तिर्थक्षेत्राचा विकास आराखडा समोर ठेवून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा कायम स्वरूपी विकास करण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आषाढी वारी च्या अनुषंगाने विभाग स्तरावरून झालेल्या एका बैठकीत सांगितले.
दि 9, 10 आणि 11 जुलै 2022 च्या बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री दादा भुसे यांनीही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्याकडे विविध सूचना मांडून वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची मागणी केली.
मोठी बातमी खाते वाटपाचा फॉर्मुला ठरला | दोन मंत्री पद रिक्त ठेवली ती कोणासाठी...वाचा
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पालखी मार्ग, पंढरपुरात पाण्याचे टँकर,गॅसची सुविधा देण्यात आली आहे. गर्दी नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आषाढी वारी नियोजनाच्या अनुषंगाने दिली माहिती
वारी कालावधीमध्ये संपर्कासाठी वॉकीटॉकीची व्यवस्था, पंढरीची वारी हे ॲप , यातून वारकऱ्यांना सुविधांची माहिती देण्यात आली आहे. वारीसाठी 140 सीसीटीव्ही बसविण्यात आले असून 26 सीसीटीव्ही हे मंदिर परिसरात बसविण्यात आले आहेत.
महिला वारकऱ्यांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशिन, हिरकणी कक्षाची स्थापनाही करण्यात आल्याची माहिती शंभरकर यांनी दिली.
वारीच्या अनुषंगाने मंदिर व नगरप्रदक्षिणा मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
तसेच 10 माऊली स्क्वॉडद्वारे वारकऱ्यांना रांगेतून पुढे सरकण्यासाठी प्रेमाने विनवणी करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर कोणतीही घटना घडली तर त्वरित संपर्क होण्यासाठी 400 गॅमा कमांडो 100 दुचाकीसह नेमण्यात आले आहेत.त्यांच्याकडे वॉकीटॉकी देण्यात आल्या आहेत.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे हे ही दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.*NewsMajha मतभेदांमुळे आज राजकीय वातावरण तापणार | विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार | कसे ते वाचा* https://aplaepaper.blogspot.com/2022/07/blog-post_89.html#.YsDmGTHBsos.whatsapp
महत्वाची अशीच बातमी घेतो त्यासाठी स्पर्धा करत नाहीत देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं,हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते.'आपलाlive@news' माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न,करतो.त्याचंच पुढचं पाऊल म्हणून fast बातमी आपल्या पर्यत send करतोआपली नाती आपली माणसंआपलं प्रेम जपण्याचा हा छोटासा प्रयत्न व ज्ञानाचा प्रसार.
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. 'आपला पेपर'(apla@livenews)माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.
0 Comments