Header Ads Widget

Responsive Advertisement

धक्कादायक | लोकांच्या डोळ्यांसमोर गाडी नदीच्या पाण्यात पलटी झाल्याने 6 जण वाहून गेले

एक धक्कादायक घटना लोकांच्या डोळ्यांसमोर स्कार्पिओ गाडी नदीच्या पुरात पलटी झाल्याने 6 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले 

सध्या सगळीकडे पावसाने हहाकार  घातला असून प्रत्येक गावातील छोटे-मोठे नदी नाले व ओसंडून वाहत असून या पुलावरून वाहन चालकाने काळजीपूर्वक जाणे गरजेचे असताना सुद्धा निव्वळ धाडस करून मृत्यूला आमंत्रण देऊ नये असे अनेक वेळा यंत्रणेने सांगितले असताना सुद्धा काही ड्रायव्हर स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचा जीव घेतात यातीलच हे घटना म्हणावी लागेल 


नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आला आहे. लोकांच्या डोळ्यांसमोर एक वाहन पुराच्या पाण्यात वाहून जात होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 दोन-तीन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. परिणामी नद्यांना पूर आला आहे.  नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील नंदागोमुख रस्त्यावरील पुलावर स्कॉर्पिओ वाहन उलटले. पुरात 5 ते 6 प्रवासी वाहून गेल्याची माहिती आहे. ही घटना दुपारी ३ वाजता घडली. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात स्कॉर्पिओ कारमधील काही लोक पाण्यात वाहून गेले 

Post a Comment

0 Comments