शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | 12 वा हप्तासाठी | आधी हे करा...
11 व्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर जमा, 12 वा हप्ता पाहिजे असेल तर
आधी हे करा...
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित झाली आहे.
वेबसाइट किंवा मोबाइल फोनवर याप्रमाणे E KYC पूर्ण करा
शेतकरी मोबाईल अॅपच्या मदतीने किंवा लॅपटॉप किंवा संगणकाद्वारे घरी बसून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. E KYC ऑनलाइन पूर्ण करण्यासाठी ....
1 यासाठी PM किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जा.
2 येथे तुम्हाला शेतकऱ्यांच्या कोपऱ्यावर प्रथम E KYC ची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला आधार क्रमांक विचारला जाईल.
3 येथे तुमचा आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि शोध बटणावर क्लिक करा. यानंतर मोबाईल नंबर टाका,
तोच नंबर टाका जो आधारशी लिंक आहे.
4 यानंतर OTP टाका. त्यानंतर तुमचे E KYC पूर्ण होईल. तुम्हाला ई-केवायसी पूर्ण करण्यात काही अडचण आल्यास तुम्ही आधार सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.
जे शेतकरी 11 तारखेनंतर 12 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांनी ई-केवायसी करून घ्यावे. ई-केवायसीची अंतिम मुदत 31 मे ते 31 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ई-केवायसी आवश्यक
मोदी सरकारने आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसीची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ केली आहे. जेणेकरून, 12 वा हप्ता मिळविण्यासाठी बहुतेक शेतकरी वेळेत ई-केवायसी करू शकतील. तुम्हाला सांगतो की केंद्र सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचे eKYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे.
ई-केवायसी कशासाठी
'पीएम किसान योजना' ही केंद्र सरकारची महत्वपुर्ण योजना, गेल्या चारवर्षापासून योजनेमध्ये सातत्य राहिले असून देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो आहे.
काही अपात्र शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेत आहेत. लाखो शेतकरी असे आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत पण त्यांच्याही खात्यावर पैसे जमा होत आहेत. केंद्राच्या या योजनेत तत्परता येण्यासाठी ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकिय नौकरदार, कर अदा करणारे शेतकरी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य तसेच घटनात्मक पदावर असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
नियमांचे उल्लंघन अनेकांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्याकडू वसुलीची प्रक्रिया .PM किसान पोर्टल |



0 Comments