..मिञानो
खरंच माणूस आजारी पडतो का ...?
सर्व हॉस्पिटलमधील ओपीडी बंद आहेत, इमर्जन्सी वॉर्डमध्ये कोणतीही गर्दी नाही. कोरोना बाधित रुग्ण सोडला, तर नवीन रुग्ण येत नाही आहे ? रस्त्यावर वाहने नसल्यामुळे रस्त्यावर अपघात होत नाही आहेत, कोणाला हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्राव किंवा उच्च रक्तदाब यासारख्या समस्याही होत नाही आहेत ? इतकी आजारामध्ये घट कशी झाली आहे ?
हे असे कसे घडले ?
स्मशानात ही येणाऱ्या मृतदेहांच्या संख्येत घट झाली आहे ?
हे कोरोना विषाणूने सर्व रोगांचा नाश केला आहे का ?
नाही ? बिलकूल नाही ? जिथे कोणताही गंभीर आजार नसतो नवीन कॉर्पोरेट रुग्णालये ,टेस्टिंग लॅब्स उभ्या राहिल्या ही रुग्णालय उदयास आल्यानंतर हे संकट आणखीनच तीव्र झाले आहे. थोड्या थंडी आणि खोकल्यावर हजारो रुपयांच्या टेस्ट करायला लावुन लोकांना खड्डयात घालण्याचे काम सुरु होते आणि आहे ?
आता या कोरोनामुळे हे सगळं अचानक कस बंद झाले ?
आजारापेक्षा उपचाराचीच भीती जास्त झाली आहे.
आता लोकांचे रस्त्यावरचे आणि हॉटेल, रेस्टॉरंट्स बाहेरील खाणे बंद झाले आहेत .नव्हे ते तर आता घरातल जेवण खाणे पसंत करीत आहेत.
लोकांचे अनेक अनावश्यक खर्च बंद झाले आहेत ?
हा देखील फरक कोरोनामुळे पडला आहे.
या कोरोना विषाणूमुळे जर प्रत्येक माणूस जागा झाला असेल तर, त्याला जगण्यासाठी गरज किती आहे ती समजली असेल ?
जर त्याला समजली तर त्याला आजाराची, आहाराची, आणि प्रामुख्याने पैश्याची चिंता पडणार नाही ?
आज ना उद्या कोरोना विषाणू आटोक्यात येईलच, परंतु यामुळे लोकांचे जगणे आटोक्यात आले आहे हे त्याने तसेच कायम लक्षात ठेवून लागणाऱ्या गरजा आटोक्यात ठेऊन जगलं तर आयुष्य खुप सुंदर होईल ?
हे एक कडवे सत्य आहे ?



0 Comments