परळी // कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कोरोना देशभरात सुरू असलेल्या लॉक डाऊन दरम्यान बीड जिल्ह्यात सकाळी सात ते साडेनऊ या दरम्यान असलेल्या संचारबंदी शिथिल करण्याच्या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांनी बदल करीत बीडसह चार शहरांमध्ये विषम तारखेला अकरा ते तीन यावेळेत संचारबंदी शिथिल केली आहे तर इतर सात तालुक्यात तारखेला 11 ते 2 या वेळेत संचारबंदी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी शिथिल करण्याच्या वेळेत 7 ते साडेनऊ असा बदल केला होता,दरम्यान सोमवार पासून या वेळेतही बदल केला आहे,
@बीड,अंबाजोगाई, परळी आणि माजलगाव या चार
शहरात 7,9,11 आणि 13 तारखेला सकाळी 11 ते 3 यावेळेत संचारबंदी शिथिल राहील
@तर उर्वरित भागात 8,10,12 या तारखेला सकाळी 11 ते 2 यावेळेत संचारबंदी शिथिल राहील असे आदेश देण्यात आले आहेत
सविस्तर बातमी थोड्यावेळात.



0 Comments