परळीत // कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हाभरात संचारबंदी लागू आहे.संचारबंदी शिथिल कालावधी दरम्यान काही नागरिक सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत नसून याकरिता पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी आता परळीत एसआरपी तैनात करणार येणार असल्याची माहिती अंबाजोगाई उप विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिली आहे.उद्या बुधवार दि.8 एप्रिल पासून लॉक डाऊन दरम्यान एसआरपी चे पथक शहरात दाखल होणार आहे.
लॉक डाऊन दरम्यान परळीत संचारबंदी लागू कारण्यात आलेली आहे.सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापणा काही वेळेत सुरू आहेत.या वेळेत नागरिकांनी कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टनसिंग पाळणे अनिवार्य आहे.असे असतानाही काही जण हे नियम तोडत आहेत शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत.अशा सर्व बेशिस्त नागरिकांना पोलीस प्रशासन कारवाई करत आहे,आता परळी पोलिसांच्या मदतीला एसआरपी प्लाटून उद्यापासून असणार आहे.शहरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.



0 Comments