बीड //येथे कोरोना संसर्गाच्या त्याअनुषंगाने जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. संचारबंदी काळात काही लोक चोरुन गुटखा, अवैध दारु विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाली असता त्यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी टाकण्याचे काम सुरू आहे,
त्यांच्या आदेशानुसारच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत यांच्या पथकाने ३० लाख रूपयांचा गुटखा पकडला आहे. हा गुटखा एका टेम्पोतून तांदळाच्या कट्याच्याआडून घेवून जाण्यात येत होता, म्हणजे सदर वाहन जीवनाश्यक वस्तूचे असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न माफियाचा होता, मात्र गुटखा माफियाचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे, या टेम्पोतून गुन्हे शाखेने तब्बल ५१ लाख ६१ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.१४ ते १५ एप्रिल दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वेगवेगळे पथके तयार करुन अवैध धंद्याविरुद्ध मोहीम उघडली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे व त्यांचे सोबतचे पोलीस कर्मचारी यांनी बीड शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्र . ५२ वर मांजरसुंब्याकडून बीडकडे येणारा टाटा टेम्पो पकडला आहे

0 Comments