बीड जिल्हा प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकार्यांमुळे अद्याप बीड जिल्ह्यात कोरोना घुसखोरी करू शकला नसला तरी आता मात्र जिल्हावासियांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे. बीडपासून 70 कि.मी.असलेल्या जामखेडमध्ये आज कोरोनाचे तीन रूग्ण आढळून आले आहेत. परदेशी व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नगर आणि जामखेडच्या 49 जणांचे स्वब नमुण्यासाठी पाठवले असता कालदुपारपर्यंत 28 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये तिघे पॉझिटीव्ह आले. हे तिघेही जामखेडचे आहेत.



0 Comments