Header Ads Widget

Responsive Advertisement

BREAKING NEWS ..!10 वीचा सोमवारी होणारा पेपर पुढं ढकलला.. तो पेपर कधी होणार हे 31 मार्च नंतर जाहीर


मुंबई //कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं शेवटी इयत्ता दहावीचा एका विषयाचा पेपर आता पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. सोमवारी होणारा हा पेपर आता 31 मार्च नंतर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो पेपर कधी होणार याबाबत 31 मार्चनंतर पेपरची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे. आत्तापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 285 च्या जवळ पोहचली आहे. शुक्रवारी देखील काही नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील काही रूग्णांचा देखील समावेश आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेवून राज्य सरकारनं इयत्ता 10 वी चा सोमवारी होणारा पेपर पुढं ढकलला आहे. तो पेपर कधी होणार हे 31 मार्च नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments