बीड येथे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही कठोर पाऊले उचलणे आवश्यक आहेत. गर्दी टाळण्यासाठी आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात अधिकृत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत दिली. उद्यापासून सकाळी ११ ते ३ याच वेळेत जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यास मुभा राहिलअसेही त्यांनी स्पष्ट केले. कफ्र्यु लागली म्हणून नागरिकांनी घाबरून जावू नये. प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. सर्वांनी घरात बसून रहावे असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे. यावेळी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांची उपस्थिती होती.
बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज रात्री १२ वाजेपासून जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागु केले आहेत. जिल्ह्याच्या सिमा 14 ठिकाणी लॉक केल्या आहेत.सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची देवाणघेवाण करण्यासाठी वेळ असेल.11 ते ३ या वेळेत जमावबंदी लागूच असेल. पाच पेक्षा जास्त नागरिकांना येण्यास बंदीच असेल.जीवनावश्यक, आपत्कालीन सेवा चालू राहणार ही बंदी ३१ मार्च पर्यंत राहणार आहे असे आदेश आज रोजी जिल्हाधिकारी बीड यांनी दिले आहेत.

0 Comments