Header Ads Widget

Responsive Advertisement

उद्या (सोमवार) पहाटे 5 वाजेपर्यंत वाढविल्याचे जाहीर आजून जनता कर्फ्यूच्या वेळत वाढ करण्याचे शक्यता- डॉ. टोपे



मुंबई // व्हायरसच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्या उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोराना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज (रविवार) रात्री 9 पर्यंतच्या जनता कर्फ्यूची वेळ उद्या (सोमवार) पहाटे 5 वाजेपर्यंत वाढविल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर देखील जनता कर्फ्यूच्या वेळत वाढ करण्याचे संकेत डॉ. टोपे यांनी दिले आहे.
देशातील कोरोनाच्या बळींची संख्या 7 वर गेली आहे. आज देखील कोरोनाचे नवे काही रूग्ण आढळून आले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात कलम 144 लागू केल्याचे काही तासांपुर्वीच जाहिर केले आहे. महाराष्ट्र पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे तर केंद्र सरकारकडून देशातील 75 जिल्हे हे पुर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी आज रात्री 9 वाजेपर्यंतचा जनता कर्फ्यू हा उद्या (सोमवार) पहाटे 5 वाजेपर्यंत चालू राहणार असल्याचे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments