परळी तालुक्यात धक्कादायक घटनेतील बरकतनगरमध्ये काटेरी झुडपात सापडलेल्या नकोशीच्या जन्माचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी जन्म देणाऱ्या मातेला लग्नाचे आमिष देऊन २ वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी आज गुरुवार रोजी ताब्यात घेतले आहे. शेख असलम शेख दस्तगीर (रा. बरकत नगर ) असे आरोपीचे नाव असून संभाजी नगर पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
या प्रकरणी जिवंत अर्भक फेकून दिल्यावरून नकोशी च्या मातेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एका १७ वर्षीय अविवाहितेच्या पोटी त्या बाळाचा जन्म झाला असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास केला असता १७ वर्षीय मातेवर मागील दोन वर्षांपासून बरकत नगर येथील शेख असलम शेख दस्तगीर याने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले असल्याची पोलिस तपासातील माहिती स्पष्टझाली आहे.संभाजी नगर पोलिसांनी (पीडित)बालिकाचा जवाब नोंदवून फिर्याद दाखल केली. आरोपी शेख असलम शेख दस्तगीर रा बरकत नगर यांने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची फिर्याद संभाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावरून आरोपीविरुद्ध बुधवारी बलात्कार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. (पीडित)बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही कारवाई संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक करीत आहेत



0 Comments