Header Ads Widget

Responsive Advertisement

अपघात...बीडजवळ बस व मोटारसायकल अपघात ; दोन जण जागीच ठार




बीड// बस व मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना बीड शहराजवळील च-हाटा फाटा येथे आज(बुधवारी) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. 

पुण्यावरून बीडकडे गाढे पिंपळगाव येथील राजेश वसंतराव घुमरे वय 29 वर्ष व कुलदीप सदाशिव ठोके हे दोन्ही युवक मोटारसायकल क्र. एम एच 43 टी 45 42 वरून येत होते.चर्‍हाटा फाटा येथील एका पेट्रोल पंपावर दुचाकीत त्यांनी पेट्रोल टाकले आणि भरधाव बीडकडे निघाले. यावेळी समोरुन येणाऱ्या बीड बारामती बस(एमएच-40 एन-9176) व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघातातील दोन्ही मयत युवक परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील आहेत.
या अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय सुजित बडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

Post a Comment

0 Comments