बीडा //स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठाण व जिल्हा रुग्णालय बीड यांच्या वतीने आठशे कन्यारत्नांचा नामकरण सोहळा आज बीड येथे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते पार पडला.आठशे मुलींची आत्या होण्याचे भाग्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला लाभले याचा निश्चित आनंद आहे..
मा.पंकजाताई मुंडे यांच्या अथक प्रयत्नांनी स्त्री भ्रूण हत्येचा कलंक मिटला असून मुलींचा जन्मदर वाढवण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होता आले याचा मला अभिमान आहे.जिल्ह्यातील मुलींनी राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्याचे नाव उज्वल करावे अशा सदिच्छा यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केल्या.याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना संत तरुणसागरजी महाराज सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.





0 Comments