Header Ads Widget

Responsive Advertisement

गवळी समाजाने पारंपारिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्या - ना.अहिर



गवळी समाज संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

परळी // पारंपारिक असलेला पशुपालन व दुग्धव्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन नवतरुण मंडळींनी उत्कर्ष साधतानाचं आर्थिक काटकसर करून आपल्या मुलांना उच्चशिक्षण द्यावे तसेच सामूहिक विवाह सोहळ्यासारखे उपक्रम राबवून समाज हित साधावे असे आवाहन देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे मार्गदर्शक ना.हंसराज अहिर यांनी केले आहे  श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे  गवळी समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीला मार्गदर्शन करताना ना. अहिर बोलत होते. 

    गुरुवार दि.23 जानेवारी रोजी शहरातील वैद्यनाथ मंदिर येथील दर्शन मंडप येथे गवळी समाज संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली यावेळी बोलताना ना. अहिर  यांनी समाज व संघटना याबाबत बरेच मार्गदर्शन केले . संघटना ही समाजाची ताकद असून सर्वांनी याकामी वेळ द्यायला हवाय अस बोलतानाच नावाचे पदाधिकारी होऊ नका असं सांगायलाही ते विसरले नाहीत.यावेळी 

     व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष हिरामणअप्पा गवळी, महासचिव अशोक मंडले, जगदीश गुरखुदे, वैजनाथ बागवाले यांची प्रमुख उपस्थिती होती सदरील बैठकीत जिल्ह्याची व तालुक्यांची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली व संघटनेची पुढील दिशा ठरवणेसाठीची चर्चा करण्यात आली.  या बैठकीस जिल्हाध्यक्ष मुन्ना बागवाले, कल्याण तंबरे, कैलास हदगुले,विलास गायकवाड, राजाभाऊ गायकवाड यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अथक परिश्रम घेतले. बैठकीस बीड जिल्यातील सर्व ठिकाणांहून समाजबांधवांनी उपस्थिती लावली होती.

Post a Comment

0 Comments