Header Ads Widget

Responsive Advertisement

दुःखद बातमी..! सेवानिवृत्त शिक्षक मल्लिकार्जुन नानासाहेब पत्रावळे यांचे निधन


परळी //येथील माणिक नगर भागातील रहिवासी तथा खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई येथील सेवानिवृत्त शिक्षक मल्लिकार्जुन नानासाहेब पत्रावळे यांचे आज दुःखद निधन झाले.

मल्लिकार्जुन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते .त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र शोककळा पसरली.
उद्या दि.16 सोमवार सकाळी 9 वाजता परळी येथील विरशैव लिंगायत स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सून ,तीन भाऊ एक बहीण असा परिवार आहे

Post a Comment

0 Comments