Header Ads Widget

Responsive Advertisement

अंबाजोगाई बलात्कार प्रकरणातील आरोपीला फासावर द्या-प्रा.अतुल दुबे


शिवसेना विद्यार्थी सेना,युवासेनेची मागणी

अंबाजोगाई //डॉ. रेड्डी, उन्नाव व निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य व देशात वादंग माजलेले असतानाच अंबाजोगाई शहरातील या घटनेनंतर अतुल दुबे यांनी तात्काळ या घटनेचे तपासणी अधिकारी उपविभागीय अधिकारी राहुल धस व खोलेश्वर शाळेतल्या मुख्याध्यापिका धर्मपात्रे यांची भेट घेऊन या आरोपीचे तात्काळ निलंबन करून पोक्सो अंतर्गत लवकरात लवकर  कारवाई करण्याची मागणी केली.

येथील एका नामवंत शाळेतील क्रिडा शिक्षकाने नववीत शिकणार्या मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे प्रकरणातील आरोपीला फासावर द्याअशी मागणी शिवसेना,भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने विद्यार्थीसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केली.
   
या वेळी त्यांच्या सोबत तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे,शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अभिमन्यू वैष्णव,परळी तालुका समन्वयक अमित कचरे, शहर संघटक अशोक काळे, उपशहरप्रमुख गणेश जाधव,महिला आघाडीच्या उषाताई यादव,युवा सेना उपशहरप्रमुख दिनेश उपरे,आकाश सुरवसे, विद्यार्थी सेना शहर अवधुत कुलकर्णी, बालाजी वैष्णवअभिजित धुमाळ, शशिकांत सुर्यवंशी,गणेश सुर्यवंशी,सचिन सुरवसे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments