Header Ads Widget

Responsive Advertisement

नितीन गडकरी यांच्या निर्णयाने सत्तापेच सुटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 'राजकीय वादळ' दशा दिशा बदलणार..?



महायुतीच्या नाट्यमय राजकीय वादळातील वादविवाद ...


1) जनतेला शिवसेनेला फसवणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे.

2) 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये फरक आहे.

3) उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली आहे की राज्याचं नेतृत्त्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार.

4) देवेंद्र फडणवीस हे जर भाजपचे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी 145 ने बहुमत दाखवून शपथ घ्यावी.

5) भाजपला विचारा की ते त्यांच्या भूमिकेवर ठाम का नाही आहेत.

6) राज्यात अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होतेय ते राज्याचं नुकसान करत आहेत.

7) चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटले. त्यावेळी सरकार स्थापनेचा दावा का केला नाही.

8) उद्धव ठाकरे हे कायम त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

9) सत्ता गेली की सारा माज निघून जातो.

10) शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल नाही. मुख्यमंत्री हा सेनेचाच होणार.

11) शिवसैनिक खोटं बोलत नाही आणि शिवसैनिक दिलेला शब्द पाळतो.

12) आम्ही आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलेलं नाही.

13) सरकार स्थापन करण्यासाठी भाजप असमर्थ झाल्यास शिवसेना पुढाकार घेणार

14) संविधानात राहून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू

15) अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री यावर युती झाली आहे

16) उद्धव ठाकरे जे ठरवतील ते करू हे सगळ्या आमदारांना मान्य आहे.

17) सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

18) 8 तारखेपर्यंत विधानसभेची तारीख आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे पण सत्ता स्थापन करेनात.

19) भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे तर राज्यपालांकडून रिकाम्या हाती का परत आले.

20) सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचं संख्याबळ तयार जर भाजपकडे असेल तर 2 दिवसांत राज्यपालांकडे जावं.

21) शिवसेनेकडे आणखी वेगळे पर्याय आहेत.

22) मुख्यमंत्री भाजपचा होणार हे वारंवार भाजपचे नेते म्हणतात पण त्यांच्याकडे बहुमत नाही.

23) सरकार मिळावं, या राज्याला ताकद देण्याचं काम शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल.

24) दडपशाही आणि गुंडगिरी आता चालणार नाही.

25) भाजपने जाहीर करावं की आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थ आहोत. त्यानंतर शिवसेना पाऊलं उचलेन.

26) शिवसैनिक खोटं बोलून सत्तेत येत नाही त्यामुळे भाजपनेही तसं राहावं.

27) युती तोडण्याचं पाप मी करणार नाही, दुसरा पर्याय मी निवडणार नाही उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट.

28) यापुढे राज्याचं नेतृत्त्व हे शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल.

29) भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही.

30) माझ्यावर कोणी नाराज असेल तर तो माझा सन्मान आहे.

31) भाजपचे खेळ आता जूने झालेत. जर बहुमत असेल तर सिद्ध करावं नसेल तर समोर येऊन सांगावं.

32) भाजपने दोन दिवसांत 145 आमदारांची यादी दाखवावी.

33) आता आमची संयमाची भूमिका आहे.

34) भाजपला बहुमत मिळेनासे झाले आहे.


मुंबई //नितीन गडकरी यांच्या निर्णयाने सत्तापेच सुटेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्रीपदाशिवाय आणि इतर काही महत्वाची खाती देण्यास भाजप तयार आहे. त्यामुळे आता शिवसेना सत्तेत सहभागी होण्याची शक्यता दाट वाढली आहे. शिवसेनेत दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत, भाजपसोबत जाण्यासाठी शिवसेनेचे काही मंत्री इच्छूक आहे. 

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसताना आज देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ओला दुष्काळावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री उतस्थित होते, यात शिवसेनाचे 6 मंत्री देखील उपस्थित होते. यावेळी बैठकीनंतर यातील 2 मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह सत्तास्थापनेवर चर्चा केल्याची माहिती मिळते आहे.
मागील दोन आठवड्यापासून शिवसेना मंत्रिपदावर ठाम आहे. युतीत सत्ता स्थापनेवरुन पेच आहे. अशात संजय राऊत यांनी आठवड्यात दोनदा शरद पवारांची भेट घेतली. भाजपवर दबाव आणण्याचा शिवसेना प्रयत्न करत आहे. 

Post a Comment

0 Comments