Header Ads Widget

Responsive Advertisement

शिंपीसमाजाचे ज्येष्ठ नागरिक भास्कर पांडुरंग धोकटे यांचे निधन


परळी //  शिंपीसमाजाचे ज्येष्ठ नागरिक भास्कर पांडुरंग धोकटे रा.कृष्णा नगर यांचे आज सोमवार  दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते.पानाचे व्यापारी बालाजी धोकटे यांचे ते वडिल होते .

त्यांच्या पार्थिवावर परळी येथे मंगळवार दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.भास्कर पांडुरंग धोकटे हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. कृष्णा नगर मधील विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग होता.अत्यंत मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती.

Post a Comment

0 Comments