Header Ads Widget

Responsive Advertisement

खूशखबर ! दक्षिण मध्य रेल्वेची नवीन विशेष गाडी नांदेड-औरंगाबाद-नांदेड सुरु होणार ..


नांदेड // दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नांदेड -औरंगाबाद-नांदेड अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. हि नवीन विशेष गाडी  दिनांक 03 सप्टेंबर 2019  पासून ते दिनांक 30  सप्टेंबर 2019  दरम्यान  चालविण्यात येणार आहे.हि गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावेल. ही गाडी नांदेड येथून सकाळी 08.00  वाजता सुटेल. या गाडीला पूर्णा, परभणी, मानवतरोड , सेलू, परतूर, रांजणी, जालना, बदनापूर , मुकुंदवाडी येथे थांबे आहेत.  हि गाडी औरंगाबाद येथे दुपारी 12.45  वाजता पोहोचेल. 

परतीच्या प्रवासात हि गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी 18.10 वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री 23.00 वाजता पोहोचेल. 
या गाडीस 08  डब्बे असतील. प्रवाशांना विनंती आहे आपण या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन  राजेश शिंदे व दक्षिण मध्य रेल्वे  नांदेड विभाग यांनी केले आहे .

@गाडीचे वेळा पत्रक. 


Post a Comment

0 Comments