Header Ads Widget

Responsive Advertisement

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात, यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी

पुणे //पुणे -सोलापूर रोडवरील वरकुटे फाटा येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला पुणे -सोलापूर रोडवर अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले. यात आनंद शिंदे यांच्यासह ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गायक आनंद शिंदे हे रात्री पुण्याहून सोलापूरला तवेरा गाडीने जात होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इंदापूरजवळील वरकुटे फाटा येथे आनंद शिंदे यांच्या गाडीच्या चालकाला पुढे जाणारा डंपर दिसला नाही. चालकाने डंपरला पाठीमागून धडक दिली. त्यात आनंद शिंदे यांच्या पायाला मुका मार लागला आहे. त्यांच्यावर इंदापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर ते पुण्याला परतले. 

Post a Comment

0 Comments