Header Ads Widget

Responsive Advertisement

धक्कादायक ! धुळे जिल्ह्यात केमिकल्स कंपनीमध्ये भीषण स्फोट आत्‍तापर्यंत 13 जण मृत्युमुखी

धुळे //जिल्हयातील शिरपूर जवळ असलेल्या रूमित केमिकल्स कंपनीमध्ये आज शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये आत्‍तापर्यंत 12 जण मृत्युमुखी पडले आहेत तर 58 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना जवळील रूग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे. मयतांमध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे.

रूमित केमिकल्स कंपनीत नेमक्या कोणत्या कारणामुळं स्फोट झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्‍नीशमन दलाचे जवान, पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि स्थानिक नागरिक कंपनीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अग्‍नीशमन दलाचे बंब घटनास्थळी सकाळीच दाखल झाले आहेत.  मयतांचा आकडा वाढला असून तो 12 वर जाऊन पोहचला आहे. मयतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. शिरपूरजवळ वाघाडी ही केमिकलची फॅक्टरी आहे. सकाळच्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आजुबाजुच्या परिसराला देखील त्याचा हादरा बसला.

Post a Comment

0 Comments