Header Ads Widget

Responsive Advertisement

झुंजार नारी मंच बीड आणि अखिल भारतीय नाट्य परिषद फॅशनशोमध्ये प्रथम पारितोषिकची मानकरी ठरली कु हर्मिका जगतकर



  बीड // अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या डॉ.सौ दीपाताई क्षीरसागर व झुंजार नारीच्या सचिव सौ. आशा वरपे,  झुंजार नारी मंच व फॅशन जगतातील सुप्रसिद्ध दोन मॉडेल्स पूजा वाघ  व  गीतांजली ठोमके मिसेस इंडिया ज्यांच्या परीक्षणातून विजेते ठरवण्यात आलं ही स्पर्धा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत होती यामध्ये बीडकरांनी भरभरून असा प्रतिसाद दिला,
28 रोजी झुंजार नारी मंच बीड आणि अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा बीड  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किड्स, मिस, मिसेस फॅशनशोचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमास बीड शहरातील शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. काल सायंकाळी हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्य सभागृह मध्ये आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या प्रमुख  चार तास हा कार्यक्रम चालला. कु. हर्मिका जगतकर यांच्या तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील  शिक्षक सिद्धार्थ अग्रवाल व खान सर तसेच ड्रेस डिझायनर रंजना जोगदंड तसेच मेकअप स्वप्नाली सुतार मॅडम यांनी मेहनत घेतली. कु. हर्मिका जगतकर ही सा. बीड अक्षरधाम चे संपादक बालाजी जगतकर प्राचार्य उमा जगतकर तुलसी स्कूल बीड यांची कन्या आहे.

विजेती हार्मीका हिचा शाळेतही सत्कार करण्यात आला व तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments