गंगाखेड // पालम शहरात दोन गटातील युवकाच्या झालेल्या वादावादीचे रुपांतर हाणामारी सह जाळपोळीत झाले....
या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. असून सदरील घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे .
बुधवारच्या सायंकाळच्या सुमारास दोन युवकांमध्ये अतिशय क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि त्या वादाचे पर्यावसान मोठ्या प्रमाणात झाल्याचे प्राथमिक माहितीत म्हटले आहे... शहरात किरकोळ कारणावरून दोन गटातील युवकामध्ये वादावादीचे रुपांतर हाणामारी मध्ये होत.. यातील समाजकंटकानी मुख्य चौकातील दुचाकीचीही जाळपोळ केल्याची घटना घडली आहे, यासह काही दुकानावर दगडफेक झाल्या यासारख्या घटना घडल्यामुळे शहरातील बाजारपेठ लगेच बंद झाले
घटनेचे गांभीर्य ओळखून रात्री उशिरा पोलिस फोर्स शहरात विविध ठिकाणाहून दाखल झाले आहेत ...



0 Comments