परळी // परळीतील राणी लक्ष्मीबाई टावर येथील मोंढा मार्केट कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांत एकाच रिमझिम पावसाने पाणी ... साचले असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ रस्त्यावरील हे खड्डे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत .
परळी न.प च्या हद्दीतील दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे असल्याने वाहनधारकांना याचा नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ .रात्रीच्या वेळी तर हा त्रास अधिकच वाढतो़ त्यामुळे वाहने
चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे़
या रस्त्यावरील हा खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत़ आणि विशेष म्हणजे एकाच रिमझिम पावसाने या खड्ड्यांत पाणी साचून हे खड्डे वाहनधारकांना लक्षात येत नसून अनेक अपघात होत आहेत .





0 Comments