Header Ads Widget

Responsive Advertisement

धक्कादायक ! पाणी टंचाईचा बळी ! हेडला जोडलेल्या टँकर वेगळा करण्यासाठी चिसीची कॉटर पिन काढताना टँकर आणि हेडच्या मध्ये सापडून एका युवकाचा मृत्यू



अंबाजोगाई// हेडला जोडलेल्या टँकर वेगळा करण्यासाठी चिसीची कॉटर पिन काढताना टँकर आणि हेडच्या मध्ये सापडून एका युवकाचा मृत्यू झाला.  सदरील घटना आज सकाळी 9वा.पट्टीवडगावात घडली असल्याने हळहळ व्यक्त केली जात असून राम अंकुश वाकडे(वय25) मृत युवकाचे नाव आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगावात लग्न सोहळा होता या सोहळ्याला शेतातून  टँकरने पाणी आणून . ट्रॅक्टर उभा करून हेडला जोडलेल्या टँकरच्या चिसीची कॉटर पिन काढत असताना टँकर आणि हेडच्या मध्ये युवक अडकला, आरडाओरडा केल्यानंतर काही युवक धावून आले आणि युवकाला बाहेर काढून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरनी मयत घोषित केले. राम अंकुश वाकडे(25)असं मयत झालेल्या युवकाचे नाव असून त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी आणि दोन महिन्याचा मुलगा आहे.

Post a Comment

0 Comments