Header Ads Widget

Responsive Advertisement

धक्कादायक ! मोबाईलगेम खेळण्यास नकार दिल्याने संतापलेल्या १५ वर्षाच्या लहान भावाने १९ वर्षाय मोठ्या भावाचा केला ! खून...



 मुंबई // मोठ्या भावाने मोबाईलवर पबजीगेम  खेळण्यास नकार दिल्याने संतापलेल्या १५ वर्षाच्या लहान भावाने १९ वर्षाय मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) भिवंडीत घडली. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह (वय-१९ रा. चौहान कॉलनी) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी लहान भावाला शांतीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोहम्मद फहाद असे ताब्यात घेतलेल्या लहान भावाचे नाव असून तो आज आईच्या मोबाइलवर पबजी खेळत होता.
त्यावेळी त्याच्या मोठ्या भावाने पबजी खेळण्यास मनाई केली. तसेच त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे फहादला राग आल्याने त्याने हुसैनी बरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. फहादने घरातील कैचीने हुसैन याच्या पोटावर आणि छातीवर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हुसैनला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून फहादला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments