Header Ads Widget

Responsive Advertisement

धक्कादायक ! पती पत्नीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या



वाशिम //  पती पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वाशिमच्या देवपेठ परिसरात समोर आला आहे. दोघांनी सुसाईड नोट लिहीली असून आपल्या मुलीचा सांभाळ वडीलांनी करावा असे लिहिले आहे.
रोशनी सुनील जाधव (वय २३) आणि सुनील जाधव (वय २६) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
सुनील जाधव हा उमरखेड तालूक्यातील चुरमुरा येथील राहणारा आहे. तो वाशिममध्ये राहण्यास होता. तर त्याचे लग्न पुसद्च्या रोशनी हिच्याशी झाला होता. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. त्यांच्यासोबत रोशनी हिची बहिण राहण्यास आहे. तिला आज रात्री साडेबाराच्या सुमारास लहान मुलगी रडत असल्याचा आवाज आला. त्यानंतर तिने दोघांच्या खोलीत डोकावले तेव्हा दोघांनीही गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर तिने तात्काळ शेजाऱ्यांना महिती दिली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. दोघांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहीली असून त्यात आपल्या मुलीला वडिलांनी सांभाळावे असे म्हटलेले आहे.

Post a Comment

0 Comments