Header Ads Widget

Responsive Advertisement

धक्कादायक ! धुळे जिल्ह्यात हिरे व्यापाऱ्याचा खून ; परिसरात प्रचंड खळबळ

 
धुळे // धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-सोनगीर रोडवर  गुजरातच्या हिरे व्यापाऱ्याचा  खून झाला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती, पहाटेच्या वेळी दोंडाईचा-सोनगीर रोडवर स्विफ्ट डिझायर (के.ई. 6095) कारच्या बाजुला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला परिसरातील नगारिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांनी पोलीसांना घटनेची माहिती दिली.

पोलीसांनी घटनास्थळी येऊन तपासणी केली असता खून झालेली व्यक्ती गुजरात येथील हिरे व्यापारी असल्याचे समजले. खून करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी फिंगर प्रिंट तज्ञ, श्वान पथक यांची मदत घेतली. मात्र श्वान पथकाने काही अंतरा पर्यंतच मार्ग दाखवला. खून करुन व्यापाऱ्याजवळील रोख रक्कम व ऐवज लुटून नेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबत सोनगीर पोलीस तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments