Header Ads Widget

Responsive Advertisement

एका रेल्वे प्रवाश्याच्या खोडसळपणा व परळी रेल्वे प्रशासनच्या उदासीनतेमुळे बेंगलोर नांदेड रेल्वे तब्बल एक तास रेल्वे स्टेशन बाहेरच उभी होती .


परळी //  बुधवार दि 29/5/2019 रोजी  राञी 8;30 वाजताची  बेंगलोर नांदेड या ट्रेनची कोणीतरी प्रवाशांनी बरकत नगर रेल्वे गेटवर चैन ओढल्याने तब्बल एक तास पासून रेल्वे , स्टेशन बाहेरच उभी होती .10 वाजता ती रेल्वे प्लेटफार्म वर आली.  रेल्वे प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत होते .

@चौकशी खिडकीत सतत कर्मचारी नसतात .
@परळी येथून बरेच प्रवासी रेल्वेनेच प्रवास करतात म्हणून गर्दीमुळे तिकटाची खिडकी दोन असताना कायम एक सुरू असते 
@.चौकशी व संपर्कसाठीचा फोनची नुसती रिंग वाजते फोन सुद्धा येथील कर्मचारी उचलत नाही  
यासर्व तक्रारी करून सुद्धा परळी रेल्वे प्रशासन यागोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत .

परळी  दक्षिण-मध्य रेल्वेच्या भोंगळ व बेशिस्तीमुळे नांदेड बेंगलोर गाडी मधील  रेल्वे  प्रवासी  दीड तास ताटकळत बसावे लागले .परळी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारमुळे  आज  रेल्वेतील  प्रवाशांचा एक तास खोळंबा झाल्याने त्यामुळे मनस्थाप सहन करावा लागला.ऐन उन्हाळ्यात गाडीतील उकाड्याने ञस्त  प्रवाशांमधून संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला शिव्या घातल्या . त्यामुळे अन्य गाड्या उशिराने धावत आहेत.

Post a Comment

0 Comments