परळी // शहरातील मलिकपुरा
भागातील एकाच्या जागेत ३० बाय ३०
फुटाच्या जागेत मोबाईल कंपनीचे
टॉवर बसविण्यासाठी सर्व्हे करण्यात आला आहे. मलिकपु-यामध्ये दाट
लोकसंख्या असून येण्या जाण्यासाठी
दहा फुटी सार्वजनिक रस्ता आहे. अशा
ठिकाणी मोबाईलचे टॉवर बसविण्याच्या हालचाली सुरु आहेत. याठिकाणी भविष्यात रहिवांशाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती या भागातील
नागरिकांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व
जिल्हाधिका-यांकडे केली आहे. या
निवेदन मुख्याधिकारी, सहाय्यक पोलीस
निरीक्षक परळी शहर यांना देण्यात
आली आहे. याभागातील सामाजिक
कार्यकर्ते शेख फतरु म्हणाले,
मलिकपुऱ्यात खुल्या जागेत मोबाईल
कंपनीचे टॉवर उभारण्यात येणार आहे.
याठिकाणी येण्या-जाण्यासाठी केवळ
दहा फुटी सार्वजनिक रस्ता आहे व घरे
जवळजवळ आहेत. मोटारसायकली,
सायकली उभ्या करण्यास जागा अपुरी
आहे. त्यामुळे येणा-या जाणा-या
नागरिकांना आगोदरच त्रास सहन
करावा लागत आहे. त्यातच
मोबाईलचे टॉवर उभारण्यात येत
असल्याचे सांगण्यात येत आहे.
हवेमुळे, वादळ, अतिवृष्टीमुळे अपघात
होण्याची शक्यता मोबाईल टॉवरमुळे
शक्यता आहे. टॉवरच्या रेंजमुळे
लहान मुळे, गरोदर स्त्रिया, अंध,अपंग,
नागरिकांना त्याचा धोका होण्याचा
संभव आहे. त्यामुळे याठिकाणी
मोबाईल टॉवर बसविण्यास परवानगी
देण्यात येऊ नये, अशी मागणी शेख
फतरु शेख जाखेर हुसेन यांच्यासह
नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.



0 Comments