✌🏻🚩 फोटो चे राजकीय गणित काय क्षीरसागर बंधू मातोश्रीवर …..!
बीड // राष्ट्रवादीचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर या दोघांनी आज मातोश्रीवर हजेरी लावल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर आणि भारतभूषण क्षिरसागर ( बीड नगराध्यक्ष ) यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर हे उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत क्षिरसागर कुटुंबीयांनी ठाकरे कुटुंबीयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या.गेले काही महीने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षिरसागर यांचे मातोश्रीवर येण्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होणार हे निश्चित आहे .
क्षीरसागर यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन केल्यानंतर ते भाजप मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती मात्र शनिवारी रात्री उशिरा त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने ते सेनेत प्रवेश करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे .

0 Comments