परळी वैजनाथ// बीड जिल्ह्यात प्रथमच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन येथील शनैश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने रविवारी (ता.०७) करण्यात आले आहे.या मेळाव्याससमाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शनैश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शनैश्वर प्रतिष्ठाणच्या वतीने बीड जिल्ह्यात पहिल्यांदा तेली समाजाचा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे अध्यक्ष तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. हा मेळावा रविवारी (ता.०७) सकाळी १०.०० वाजता हालगे गार्डन मंगल कार्यालयात होणार असून या मेळाव्यासाठी राज्यभरातून तेली समाज बांधव, वधूवर, पालक यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्याच्या आयोजन संदर्भात गुरुवारी (ता.०४) शहरातील समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. येथील समाजबांधवांच्या या मेळाव्याच्या तयारीसाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्ह्यात प्रथमच होत असल्याने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. राज्यातून येणाऱ्या समाजबांधवांसाठी शनिवारी मुक्कामी येणाऱ्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी दुपारी १ ते ४ स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी या वधूवर पालक परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मेळावा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



0 Comments