() केज //तालुक्यातील बनसारोळा येथे टपाल वाटप करून घरी आलेल्या ३८ वर्षीय पोस्टमनचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात येत आहे.मात्र वैद्यकीय अहवाल नसल्याने मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट झालेले नाही.
तालुक्यातील बनसारोळा येथील विक्रम भीमराव गायकवाड हे पोस्टमन म्हणून अनुकंपा धर्तीवर काम करत होते. परवा शनिवारी ते नेहमीप्रमाणे टपाल वाटप करून दुपारी दोन वाजता घरी आले असता अचानक त्यांना प्रचंड ताप चढला व अस्वस्थ होऊ लागले.दरम्यान एक खाजगी वाहन बोलावून त्यांना अंबाजोगाई येथे दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे त्यांना दवाखान्यात न नेता परत आणण्यात आले व अंत्यविधी करण्यात आला. दवाखान्यात न जाता परत आणल्याने त्यांचा वैद्यकीय अहवाल मिळू शकला नाही.त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला ? हे स्पष्ट होऊ शकले नाही.परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने व उन्हातून घरी आल्याने त्यांचा उष्माघातानेच मृत्यू झाला असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी व एक मुलगी आहे


0 Comments