परळी : वीटभट्टीजवळ झोपलेल्या दोन युवकांच्या अंगावरून मातीचे टिपर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
अजय बनसोडे (वय २१) आणि अशोक मस्के (वय १८, रा.मांडखेल ता.परळी) अशी त्या युवकांची नावे आहेत. हे दोघेही सिरसाळा येथील विटभट्टीवर कामगार होते. शुक्रवारी दिवसभर काम केल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते राखेच्या ढिगाऱ्यावर झोपले होते. मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास १० चाकी हायवा टिपर माती घेऊन आले. त्यांना या मुलाबद्दल काहीच माहिती नव्हती. या चालकाने भरधाव टिप्पर त्यांच्या अंगावर घातले. हे टिप्पर डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कामगार व पोलिसांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
********
वाचा विवेकसिंधु


0 Comments