Header Ads Widget

Responsive Advertisement

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे ! रक्तदानामुळे अनेक रूग्णांचे प्राण वेळोवेळी वाचवले जावू शकतात- डॉ. अशोक थोरात





बीड,//  रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे अनेक गरजुवंत रूग्णांचे प्राण वेळोवेळी वाचवले जावू शकतात. दिवसेंदिवस रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे. त्या अनुषंगाणे गेल्या अनेक वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने या वेळीही शुक्रवार (दि.5) एप्रिल रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे आयोजित करण्यात आला होता. यात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजुवंत रूग्णांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे. असे  प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी व्यक्त केले.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवाची शुक्रवार (दि.5) एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने सुरूवात झाली.  या रक्तदान शिबीराचे उद्घाटन तथागत गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पफुले अर्पण करून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हास्ते करण्यात आले. यावेळी मुंबई चैत्यभुमीचे राष्ट्रीय सदस्य भदंत धम्मानंद, डॉ. सुधिर साळवे यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच रक्तदान शिबीर समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे अनेक गरजुवंत रूग्णांचे प्राण वेळोवेळी वाचवले जावू शकतात. दिवसेंदिवस रक्तदानाचा तुटवडा जाणवत आहे. त्या अनुषंगाणे गेल्या अनेक वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. त्या अनुषंगाने गुरूवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरामध्ये शेकडो रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. दरम्यान अमर विद्यागर यांच्या रक्तदानाने या रक्तदान शिबिरास सुरूवात झाली.

 या रक्तदानाच्या शिबीरासाठी जिल्हा रूग्णालयातील डॉ. दिपाली गव्हाणे, डॉ. जयश्री बांगर, विजय मुंडे आकाश गायकवाड, दिलिप औसरमल, बिभिषण म्हात्रे, बाळासाहेब बन, गणेश बांगर यांनी रक्तदानाची वैद्यकिय जबाबदारी पार पाडली. हा रक्तदान शिबीराचा कार्यक्रम यशस्विरित्या पार पाडण्याकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तसेच रक्तदान शिबीर समिती यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments