Header Ads Widget

Responsive Advertisement

अनेक गुढ कथेतील हिममानवाच्या भल्या मोठ्या पावलांचे ठसे भारतीय सैनिकांच्या पथकाने पाहिल्याचा दावा



मुंबई // दंतकथामध्ये हिममानवाविषयी अनेक गुढ कथा सांगितल्या जातात. यापूर्वी काही जणांनी धिप्पाड अशा हिममानवाला पाहिल्याचे दावे केले होते. मात्र, आता भारतीय सैनिकांच्या पथकाने हिममानवाच्या भल्या मोठ्या पावलांचे ठसे पाहिल्याचा दावा केला आहे. हिममानव प्रत्यक्षात असल्याची शक्यता अधिकृतपणे वर्तवली आहे. बर्फामध्ये दिसणाऱ्या हिममानवाच्या पाऊलखुणांचे फोटो सैन्याने ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहे.
गिर्यारोहण मोहिमा करणाऱ्या भारतीय सैन्याच्या पथकाने रहस्यमय वाटणाऱ्या भल्या मोठ्या पावलांचे हे ठसे म्हणजे यती म्हणजेच पुराणकथांमधील दैत्याच्या पावलांचे ३२ गुणिले १५ इंच आकाराचे ठसे पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचा दावा सैन्याने केला आहे.
नेपाळ -चीन सीमेवर मकालू बेस कॅम्पजवळ ९ एप्रिल २०१९ ला ही गोष्ट सैनिकांच्या निदर्शनास आली. या भागात आढळणाऱ्या कुठल्याच प्राण्याच्या पावलांचे ठसे या आकाराचे नसल्यामुळे भारतीय सैन्य चाट पडले आहे. मकालू बारुन नॅशनल पार्कच्या याच परिसरात पूर्वीही हिममानवाचे ओझरते दर्शन घडल्याचा दावा करण्यात आला होता.
यतीचे वर्णन दोन पायांवर चालणारा अवाढव्य वानर अशा स्वरुपात केले जाते. तो मानवाचा पूर्वज मानला जातो. १८३२ साली पहिल्यांदा एका गिर्यारोहकाने उत्तर नेपाळमध्ये दोन पायांवर चालणारे महाकाय वानर पाहिल्याचा दावा केला होता.

Post a Comment

0 Comments