Header Ads Widget

Responsive Advertisement

पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू




पुणे // खेळताना नवीन बांधकामाच्या पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरुड येथील शास्त्रीनगर परिसरात रविवारी सायंकाळी घडली. पिनाक सत्यवान तोंडे (४ वर्षे) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक शैलजा जानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तेथे पाण्याची टाकी खोदकाम करून तयार करण्यात आली आहे. त्यावर हलके झाकण लावण्यात आले होते. त्या इमारतीच्या शेजारी राहणारी मुले सायंकाळी लपाछपी खेळत होती. त्यावेळी पिनाकही तेथे खेळत होता. मात्र खेळता खेळता अचानक पिनाक गायब झाला. त्याचा सर्वांनी शोध घेतला. त्याची शोधाशोध करूनही तो मिळून आला नाही. पाण्याच्या टाकीत पाहिले असता तो टाकीत मिळून आला. त्याला शेजारील खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

उघडी टाकी ठेवल्याने आणि झाकण नसल्याने हा अपघात झाला आहे, अशी नागरिकांची तक्रार आहे. सबंधित बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्याची नागरिक मागणी करत आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक शैलजा जानकर करत आहे.

Post a Comment

0 Comments