Header Ads Widget

Responsive Advertisement

परभणीमध्ये खळबळजनक घटना ! जुन्या वादातुन नगरसेवकाची हत्या ; आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर



परभणी  //   जुन्या वादातुन नगरसेवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना परभणीमध्ये रविवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे परभणीतील जायकवाडी वसाहतीसह संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

अमरदीप रोडे असे हत्या झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे तर रवि गायकवाड आणि किरण ढाके अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले असुन पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. झालेल्या किरकोळ वादातुन अमरदीप यांचेच सहकारी गायकवाड आणि ढाके यांनी त्यांच्यावर हल्‍ला केला. हल्‍ला करून दोघेही पोलिस ठाण्यात पोहचले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिसांनी रवि गायकवाड आणि किरण ढाके यांना अटक केली. नेमक्या कोणत्या कारणामुळे गायकवाड आणि ढाके यांनी अमरदीप रोडे यांच्यावर हल्‍ला केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. नगरसेवक अमरदीप रोडे यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला आहे.

नगरसेवकाच्या हत्येनंतर परिसरात व संपुर्ण शहरात या हत्येनंतर खळबळ उडाली असुन तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरसेवकाची हत्या झाल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे.

Post a Comment

0 Comments