दिल्ली // पुलवामा यथे झालेल्या हल्ल्यानंतर पहाटे 3.30 वाजता भारतीय हवाई दलाकडून चोख प्रत्युत्तर देत भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदचा अल्फा 3 हा नियंत्रण कक्ष आणि लाँच पॅड नष्ट केला. हा घटनाक्रम नक्की कसा होता यावर टाकूया एका नजर .
या हल्ल्यात 12 लढाऊ विमानं आणि 21 मिनिटं…. वायूसेनेनं असा केला 350 दहशतवाद्यांचा खात्मा.
1 ) हा हल्ला जेव्हा करण्यात आला तेव्हा भारतातील सामान्य जनता गाढ निद्रावस्थेत असावी. त्यावेळी भारतीय वायुसेना मात्र पाकिस्तानची झोप उडवण्याच्या तयारीत होती. सर्व प्लॅन तयार होता. अत्यंत गुप्तपणे पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकसाठी वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन ग्वाल्हेर, भटिंडा, अंबालासह 20 एअर बेसेसवरुन मिराज 2000 विमानांनी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी उड्डाणं घेतली.
2) भारतीय सैन्य दलाची शान मिराज विमानं 2300 किलोमीटर या वेगानं हल्ला करण्यासाठी तयार होती. पुढच्या तीन ते चार मिनिटात भारतीय लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मिरात प्रवेशात केला.
3) भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा हल्ला केला. भारतीय हवाई दलाने 1971 नंतर प्रथमच पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरुन खोलवर सर्वप्रथम कारवाई केली. ही कारवाई सुरु असतानाच पहाटे पावणे चार वाजता काही विमानांनी मुजफ्फराबाद येथील तळावर हल्ला केला. जवळपास 8 मिनिटे हा हल्ला सुरु होता. त्याचवेळी चकोटी येथे 3 वाजून 56 मिनिटांनी हल्ला केला. भारतीय विमानांनी तब्बल 9 मिनिटे जोरदार बॉम्बफेक करुन येथील तळ उद्धस्त केले. एवढा शक्तीशाली बॉम्ब टाकल्यानंतर तेथील धुरांचे डोंगर उसळले होते.
4) दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर भारतीय विमानं अवघ्या काही मिनिटात हल्ला करून परत आली


0 Comments