Header Ads Widget

Responsive Advertisement

जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

 औरंगाबाद //  जिल्हा बदलीचे काम करुन देण्यासाठी १४ हजार ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.

संजीव रामभाऊ इंगले (वय ३५, वरिष्ठ सहायक, पंचायत विभाग, जिल्हा परिषद, औरंगाबाद) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय कर्मचाऱ्याने तक्रार केली होती.

तक्रारदार यांना जिल्ह्यातून बदली हवी होती. त्यासाठी त्यांनी संजीव इंगले यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी जिल्हा बदलीचे काम करुन देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी करताना इंगले यांनी १४ हजार ५०० रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक घाटगे, पोलीस नाईक होनराव, जिवडे, राठोड, इपर यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १४ हजार ५०० रुपये स्वीकारताना संजीव इंगले यांना पकडण्यात आले.

Post a Comment

0 Comments