Header Ads Widget

Responsive Advertisement

◆भारतीय चित्रपट निर्मात्या गुनित मोंगा यांच्या ‘पीरियड , एंड ऑफ सेन्टेन्स’ने पटकावला ऑस्कर...




लॉस एंजेलिस // चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ऑस्कर अवॉर्डवर भारतीय चित्रपट निर्माती गुनित मोंगा यांनी आपली मोहोर उमटवलीआहे. यंदाचा ९१ वा ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे रंगला होता.या ऑस्कर सोहळ्यात भारतीय माहितीपटाने (डॉक्टुमेंटरी) ‘सर्वोत्कृष्ट लघुपट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट’साठीचा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.गुनीत मोंगा यांनी या डॉक्युमेंटरी ची निर्मिती केली आहे.

ऑस्कर अवॉर्ड मिळाल्यानंतर गुनीत मोंगा यांनी ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘या पृथ्वीवर प्रत्येक स्त्रीला ती देवीचा अवतार आहे असं वाटलं पाहिजे. आम्हा सर्वांचा विजय झाला आहे’ अशा शब्दात गुनीत मोंगा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मासिकपाळीच्या दरम्यान महिलांना पॅड उपलब्ध होत नाहीत. अशा दिल्लीजवळील हापूर गावातील महिलांभोवती या माहितीपटाची कहाणी फिरते. पॅड उपलब्ध नसणे ही महिलांसाठी एक गंभीर समस्या आहे.त्यामुळे या महिलांना आरोग्याच्या अनेक तक्रारींना समोर जावं लागतं. पॅडअभावी मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना आजारांशी सामना करावा लागतो. त्यात काही जणींवर  मृत्यूही ओढवतो. यानंतर गावात सॅनिटरी पॅड्स बनवणारं मशिन पैसे जमाकरून बसवलं जातं त्यानंतर महिला पॅड्स तयार करायला शिकतात, आरोग्याविषयी जागृती निर्माण होते.अशा स्वरुपाचा प्रवास या माहितीपटात दाखवण्यात आला आहे. रायका झेहताबची यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला असून निर्मिती गुनित मोंगा यांच्या सिख्या एंटरटेन्मेंटने केली आहे.

Post a Comment

0 Comments