Header Ads Widget

Responsive Advertisement

मुख्यमंत्री महोदय... एकदा परळी - अंबाजोगाई प्रवास कराच..


शहराच्या प्रवेशलाअवघ्या अर्धा किमी रस्त्यावर असलेली धुळीचे चित्रे 



परळी // भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथे खऱ्या अर्थाने परळीची हद्द सुरु होते. एक रस्ता वैद्यनाथ मंदिराकडे जातो तर दुसरा रस्ता येथूनच बसस्थानकाकडे जातो. मागील काही वर्षापासून रस्त्याचे काम चालू असल्याने ही वाट बिकट वाट झाली आहे. डबर टाकल्याने प्रवेशद्वारच आबड-धोबड झाले आहे. राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे शहर असलेल्या परळीतून दुर्दैवाने रस्त्याच्या बाबतीत चांगला संदेश जात नाही. परळी शहराच्या अगदी प्रवेशद्वारावरच आगळे-वेगळे चित्र पहायला मिळाल्याने परळी शहर इतरांच्या स्वागतात जणू काही नापास झालेली आहे की काय? असे दिसून येते. नगर परिषद प्रशासन यासाठी काही करायला तयार तर नाहीच परंतु, आम्ही परळीकर नागरिकसुद्धा आपल्या शहराच्या वेशीवरच अस्वच्छतेची लक्तरे टांगावीत का? याचेसुद्धा भान आपल्याला नाही हे दुर्दैव. परळी शहराच्या प्रवेशद्वारातून अवघ्या अर्धा किमी रस्त्यावर असलेली काही चित्रे आपल्या शहराची प्रतिमा आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवित आहेत.


 भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद चौक येथे खऱ्या अर्थाने परळीची हद्द सुरु होते. एक रस्ता वैद्यनाथ मंदिराकडे जातो तर दुसरा रस्ता येथूनच बसस्थानकाकडे जातो. मागील काही वर्षापासून रस्त्याचे काम चालू असल्याने ही वाट बिकट वाट झाली आहे. डबर टाकल्याने प्रवेशद्वारच आबड-धोबड झाले आहे. राज्यात अत्यंत प्रतिष्ठेचे शहर असलेल्या परळीतून दुर्दैवाने रस्त्याच्या बाबतीत चांगला संदेश जात नाही.

 रस्त्यावरुन पुढे जातांना डाव्या हाताला भालदार चोफदारप्रमाणे स्वागत करणाऱ्या बंद पडलेल्या रस्त्यावरुन पार्क करुन ठेवलेल्या खाजगी बसेस, राखेचे टॅंकर आणि ट्रक्स दिसून येतात. एवढेच नाही तर मागील काही वर्षापासून या चौकात अवजड जेसीबीसुद्धा उभा केल्या जातात. जागेची अडचण आणि व्यवसाय म्हणून एक वेळ ही बाब समजून घेता येईल, परंतु वाढत्या वाहतुकीसाठी मोठा केलेला रस्ता आपण का अडवित आहोत याचे भान कोणालाच नाही.

उजव्या बाजूने पहाल तर आपण परळीत आहोत की आपल्या परळीची अवस्था काय भंगार झाली? असेच वाटेल. खराब झालेल्या ऍटोंचे टप्पर, रेक्झीन, टायर्स आदींचा खच पडला आहे. त्यातच भर म्हणून रस्त्याच्या कामाचे उरलेले दगड-धोंडे त्यात साचलेला कचरा, उगवलेली वेगवेगळ्या स्वरुपाची आणि धुळीत माखलेली झाडेही दिसून येतात. स्वच्छता ही जबाबदारी नगर परिषदेची आहेच परंतु एक नागरिक म्हणून आपणही त्यांना हातभार लावला असता तर परळी स्वच्छतेत पास झाली असती.

Post a Comment

0 Comments