परळी वैजनाथ // आरोग्य सुविधेच्या दृष्टीने परळी शहरात अत्यंत आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली असुन या रुग्ण वाहिकेचे पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
परळीच्या आरोग्य क्षेत्राकरिता मोठी उपलब्धी ठरणारी सर्व सुविधांयुक्त कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिका गरजू परळीकरांच्या सेवेत सज्ज झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळ गटनेते अजित पवार व राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने विविध सामाजिक लोकोपयोगी कार्यक्रम "आधार महोत्सव" अंतर्गत सुसज्ज आणि सर्व आधुनिक सुविधांनी युक्त कार्डियाक आयसीयु रुग्णवाहिकेचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.परळीतील अतीगंभीर आणि हृदय रुग्णांकरीता ही रुग्णवाहिका जिवनदायिनी ठरणारी आहे.यामध्ये अत्याधुनिक असणारे वैद्यकिय उपकरणे इंस्टॉल आहेत.परळीकरांना गंभीर आणि हृदय रुग्णांकरिता कार्डियाक रुग्णवाहिका ही लातूर,नांदेड,औरंगाबाद या ठिकाणावरून वारेमाप पैसे देऊन मागवावी लागत होती .नागरिकांना याचा नक्कीच लाभ होईल या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस - काँग्रेस मित्रपक्ष आघाडीची संयुक्त प्रचार सभा व निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप परळीत झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या हस्ते या कार्डियाकरुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी काँग्रेसचेप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,ना.धनंजय मुंडे यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेस - काँग्रेस मित्रपक्षआघाडीचे शिर्षस्थ नेतेगण उपस्थित होते.या रचनात्मक उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.




0 Comments