आरोपीची काही तासाच्या आतच गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी // सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याची गंभीर घटना पुण्यात घडली आहे. या प्रकारानंतर काही वेळेतच आरोपीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सीएमई दापोडी हद्दीत मंगळवारी ही घटना उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षाच्या मुलीवर आरोपीने अत्याचार केला. या प्रकारची वाच्यता होऊ नये म्हणून तिचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. त्यानंतर संबांधित आरोपीने काही तासाच्या अवधीत गळफास घेऊन आत्महत्या केली.


0 Comments