//
गेल्या काही वर्षांपासून परळीच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेला शेतकऱ्याचा पुतळा पुन्हा उभारण्यात यावा अशी सर्वस्तरातून मागणी होती. प्रशासकीय प्रक्रियेत हा पुतळा पुनर्स्थापित करण्यास विलंब होत होता. या मध्ये ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ने पुढाकार घेऊन पुतळा निर्माण करुन देण्याची तयारी दर्शविली व आकर्षक पुतळा तयार झाला असून आज तो प्रजासत्ताक दिनी प्रशासनाला सुपूर्द करण्यात येणार होता ,अशी माहिती मिळते .
तहसील परिसरात शेतकऱ्याच्या पुतळा बसविण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तहसील प्रशासनात काही काळ वादगं पेटले ...
परळी // एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष असताना परळीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आणि परळी तहसील यांच्या वादाने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती .माजी केंद्रिय कृषी मंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या "आधार महोत्सव" अंतर्गत परळी तहसील येथील शेतकऱ्याचा पुतळा पुनःस्थापीत करण्यासाठी आज २६ जानेवारी रोजी सुपूर्द करण्यात येणार होता पंरतु त्या तहसीलमध्ये परिसरात शेतकऱ्याच्या पुतळा बसविण्याच्या कारणावरून राष्ट्रवादी आणि तहसील प्रशासनात काही काळ वादगं पेटले होते. परंतु पोलिसांनी यात मध्यस्थी करत यावादाला शांत केले . पुतळा ताब्यात न घेता, तसेच शेतकऱ्याचा पुतळा पुन्हा उभारण्यात यावा या मागणीला विरोध झाल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि तहसील प्रशासनात वाद विवाद सुरू झाले होते .तहसील प्रशासनाची रितसर परवानगी न घेतल्यामुळे यावादाला तोंड फुटलेगेल्या काही वर्षांपासून परळीच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेला शेतकऱ्याचा पुतळा पुन्हा उभारण्यात यावा अशी सर्वस्तरातून मागणी होती. प्रशासकीय प्रक्रियेत हा पुतळा पुनर्स्थापित करण्यास विलंब होत होता. या मध्ये ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ने पुढाकार घेऊन पुतळा निर्माण करुन देण्याची तयारी दर्शविली व आकर्षक पुतळा तयार झाला असून आज तो प्रजासत्ताक दिनी प्रशासनाला सुपूर्द करण्यात येणार होता ,अशी माहिती मिळते .




0 Comments