परळी वैजनाथ // शहरातील अग्रगण्य पतसंस्था स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना ५ लाखांपर्यत कर्ज देण्यात येत होते ही कर्ज मर्यादा वाढवून ७ लाख रुपये करण्यात आली आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने खातेदार, ठेवीदार, कर्जदार, सभासद, ग्राहक, यांना जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे.या अनुषंगाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक कर्ज योजना जाहीर करण्यात आली आहे. आता शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना ७ लाखांपर्यत कर्ज मिळणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी पतसंस्था कार्यालय व व्यवस्थापक किरण सावजी यांच्याशी संपर्क साधावा.
गरजू ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी ,उपाध्यक्ष अनिल अष्टेकर, सचिव जितेंद्र नव्हाडे, कोषाध्यक्ष रवी वळसे, संचालक श्रीकांत मांडे, राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी, रवी मुळे, दशरथ होळकर, डाॅ. सौ. श्रद्धा देशपांडे, सौ. पद्मश्री धर्माधिकारी, आदींनी केले आहे.


0 Comments