परळी //संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, विधवा अपंग (दिव्यांग) आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या कुटूंबातील व्यक्ती यांचा जाहीर मेळावा महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यांच्या उपस्थितीत शनिवार, दि.2 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता अक्षता मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजीराजे चौक, परळी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यास सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ व समितीच्या सदस्यांनी केले आहे.
या मेळाव्यात वयोवृध्द, दिव्यांग, विधवा, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील व्यक्ती वारस यांच्या मंजूरी फाईल मिळालेली लाभार्थी यांना मंजूरी प्रमाणपत्र वाटप महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.पंकजाताई मुंडे, बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते प्रत्येक लाभार्थ्याना करण्यात येणार आहे. 28 मार्च 2018 ची संजयी गांधी निराधार योजना समितीच्या मिटींगमध्ये 985 लाभार्थ्यांना ऑनलाईन गेल्या 9 महिन्याचे वेतन बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. परळी व तालुक्यातील शहरामधील सर्व नवे, जुने लाभार्थी यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे तसेच या मेळाव्यास भाजपच्या सर्व गावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, शहरातील नगरसेवक, भाजप शहर व तालुका सर्व पदाधिकारी, सर्व आघाड्यांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सुधाकर पौळ व सर्व समितीच्या सदस्यांनी केले आहे.


0 Comments